GOOGLYABHAU

Online chat website Omegle shuts down-

Omegle

                       “मला माझ्या तिशिमध्ये हार्ट अटॅक नकोय….”* इंटरनेट वरची प्रसिद्ध वेबसाईट ८ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद करताना Omegle चे founder लिफ. के. ब्रुक्स म्हणाले, “आता मला मानसिक आणि आर्थिक आघात सहन करण्याची ताकत नाही राहिली. ज्यांनी कोणी या वेबसाईटचा चांगल्या प्रकारे वापर केला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता ह्या तीशिमध्ये मला हार्ट अटॅक येऊ द्यायचा नाहीय.”
१४ वर्षापासून सुरू असलेली चॅट वेबसाईट Omegle कोणतेही साईन इन न करता वापरता येत होती. खास करून तरुणाईमध्ये या वेबसाईटची लोकप्रियता खूप होती. २००९ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी ब्रुक यांनी या वेबसाइटची सुरुवात केली. तुम्ही आम्ही यूट्यूब वरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे Omegle चे व्हिडिओज पहिलेच असतील. बरेच creators या वेबसाईट चा वापर करून हे मजेशीर व्हिडिओज तयार करून content तयार करत होते, आता त्यांना हे व्हिडिओज बनवता येणार नाही आहेत, त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.

Exit mobile version