SIP सुरू करण्याची योग्य तारीख कोणती?
हा तुम्हाला सतत प्रश्न पडत असेल, तर त्याची चिंता तुम्ही करू नका, अशी कोणतीही योग्य तारीख नाहीय तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही SIP चालू करू शकता, एका सर्वेक्षणनुसार तुम्ही महिन्याच्या कोणत्याही दिवशी SIP चालू केल्यास तुम्हाला एकसारखेच रिटर्न्स मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही SIP सुरू करू शकता. समजा तुम्ही नोकरदार व्यक्ती आहात आणि तुमचा पगार महिन्याच्या १ तारखेला जमा होतो तर तुम्ही १-१० या कालावधीत केव्हाही गुंतवणुक करू शकता.
बाजारात असा कोणताच सर्व्हे तुम्हाला मिळणार नाही ज्यात असे असेल की तुम्ही ह्याच तारखेला SIP चालू केल्यास तुम्हाला इतर तारखे शिवाय जास्त परतावा मिळू शकेल. बरेचजण SIP करताना शिस्तबध्द नसतात, जर तुम्हाला खरंच चांगल्या प्रकारे परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही छोट्या रकमेपासून का होईना पण शिस्तबध्द पध्दतीने SIP मध्ये गुंतवणुक केली पाहिजे म्हणजे तुम्हाला उत्तम परतावा मिळू शकेल.