GOOGLYABHAU

Virat Kohli Scores 50th ODI Century- विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक.

Virat Kohli Scores 50th ODI Century

विराट कोहलीने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ५० वे शतक झळकावत द ग्रेट सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

न्यूझीलडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 106 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 50 व शतक ठोकत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. एकदिवसीय सामन्यात पन्नसावे शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

मुंबईत चालू असलेल्या सामन्यात त्याचे हे शतक पाहायला खुद्द सचिन तेंडुलकर उपस्थित होता. शतक झाल्यानंतर त्याने त्याने सचिन तेंडुलकरला अभिवादन केलं. वानखेडे मैदानात त्याची पत्नी अनुष्का शर्माला आणि डेव्हिड बॅकहम देखील उपस्थित होता.

शतकासोबतच विराट कोहलीने सचिनच्या एका एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जास्त 673 धावाचाही विक्रम मोडीत काढला आहे. सचिनने 673 धावा 2003 च्य विश्वचषकात फटकवल्या होत्या.

विराट कोहलीने 50 शतके खालील संघाविरुद्ध केले आहेत –

ICC Cricket Worldcup 2023

10 v Sri Lanka

9 v West Indies

8 v Australia

6 v New Zealand

5 v South Africa

5 v Bangladesh

3 v England

3 v Pakistan

1 v Zimbabwe

सचिन तेंडुलकरने विराटला शुभेच्छा देखिल दिल्या-

Leave a comment